loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी बसस्थानकात प्रवाशाचे पाकीट चोरीला; कर्नाटकातील दोघा संशयितांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी एसटी बसस्थानकात प्रवाशाच्या खिशातील पाकीट लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात कर्नाटक राज्यातील दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी विठ्ठल फटु मर्गज (वय ७६, रा. वेर्ले मर्गजवाडी, सावंतवाडी) हे आपल्या पत्नीवर उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे औषधोपचार करून बसने वेर्ले येथे घरी जाण्यासाठी सावंतवाडी एसटी बसस्थानकावर आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन आरोपींनी फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील काळ्या रंगाचे लेदरचे पाकीट चोरून नेले. पाकिटात ५,५०० रुपये रोख होते. ​या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, मिथुन आकाश बोवि (वय १९) आणि लक्ष्मी आकाश बोवि (वय ३८, दोन्ही रा. गांधीनगर, मंगळुरु, राज्य कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धुरी हे करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg