दापोली (प्रतिनिधी) : दापोलीतील मराठा मंदिर सीबीएसई स्कूल (ब्रिलियंट करिअर अकॅडेमी संचालित) आणि श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देत विविध गड-किल्ल्यांच्या हुबेहूब आणि आकर्षक प्रतिकृती साकारल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मराठा मंदिर सीबीएसई स्कूल, दापोली ब्रिलियंट करिअर अकॅडेमी संचलित मराठा मंदिर सीबीएसई स्कूल तसेच दापोली येथीलच श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई दापोली शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत. अतिशय कल्पकतेने आणि मेहनतीने किल्ल्यांची निर्मिती केली. यामध्ये किल्ल्यांचे बुरूज, तटबंदी, आणि मावळे अतिशय सुंदर पद्धतीने दर्शवण्यात आले आहेत . विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या कलाकृतीत कोणतीच कसर शिल्लक ठेवली नव्हती एवढं ते बारकाईने साकारले आहेत.
दिवाळी म्हटली की फराळ, पणत्या, आकाशकंदील आणि आकर्षक किल्ल्यांची सजावट! महाराष्ट्राच्या संस्कृतीत दिवाळीतील किल्ल्यांना विशेष महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने ब्रिलियंट करिअर अकॅडेमी दापोली संचालित मराठा मंदिर सीबीएसई स्कूल दापोली आणि श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई दापोली येथे दिवाळीनिमित्त किल्ले बनविण्याच्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आठ ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या. यामध्ये शिवनेरी, रायगड, प्रतापगड, पन्हाळगड, दातेगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग आणि रसाळगड या किल्ल्यांचा समावेश आहे. प्रत्येक किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून या प्रतिकृती साकारल्या आहेत.
विशेषत: माती, दगड, विटा आणि विविध सजावटीच्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी किल्ल्यांची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वारे आणि परिसराची मांडणी केली आहे. किल्ले तयार करताना विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, कल्पकता आणि उत्साह विशेष लक्षवेधी ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत गड-किल्ल्यांचे असलेले महत्त्व, त्यांची युद्धनीती, दूरदृष्टी आणि पराक्रम यांची ओळख विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या निमित्ताने झाली. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्याच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना वाव मिळाला.अशा या प्रात्यक्षिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाविषयी अभिमान, संघभावना आणि सहकार्याची वृत्ती विकसित होण्यास मदत झाली. दिवाळीच्या आनंदात ऐतिहासिक वारशाची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.