loader
Breaking News
Breaking News
Foto

कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई. बोर्डाच्या शाळेमध्ये दसरा उत्साहात साजरा

रत्नागिरी - प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई. बोर्डाच्या शाळेमध्ये दसरा सणानिमित्त विद्यार्थी आणि पालकांसाठी खास ’दांडिया नाईटसचे’ आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनुश्री राणे यांच्या हस्ते रोपटे देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापिका सुमन अरोरा व उपस्थित पालकांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाप्रसंगी पालक व विद्यार्थ्यांसाठी ’रॅम्प वॉक’,’उत्कृष्ट दांडिया नृत्य’ अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमधील विजेते पालक पुढीलप्रमाणे उत्कृष्ट दांडिया नृत्य स्पर्धा - प्रथम क्रमांक - निलेश गराटे, द्वितीय क्रमांक अभिलाषा पटेल, तृतीय क्रमांक - मंजिरी पाडाळकर, उत्तेजनार्थ - स्वप्नील मंजर, स्वप्नील कांबळी, तुषार लिंगायत, मनिषा पवार, अश्विनी बाबर, सानिका भुते, अर्चना बाइत, स्वरा भोसले, विनोद जाधव.. पालक आणि मुलांमधील समन्वय आणि नातेसंबंध दृढ करणार्‍या रॅम्प वॉक स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे - प्रथम क्रमांक - अभिलाषा पटेल - दर्श गौर, द्वितीय क्रमांक - उज्वला गुसिंगे - कीर्ती गुसिंगे, तृतीय क्रमांक - प्राजक्ता इंगळे व प्रिषा इंगळे.. सर्व विजेत्या पालक व विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, संस्थेच्या कार्याध्यक्षा नेहा माने, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद्युम्न माने, संस्थेच्या व्यवस्थापिका ईशानी माने यांनी सर्वांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. त्याचबरोबर अशुभावरील विजयाचे प्रतीक म्हणून रावणाच्या प्रतिमेचे दहन करून कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg