देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यात बोगस संजीवके व खतांच्या विक्रीबाबत कृषी खाते व औषध विक्रेतामध्ये साटेलोट असल्याचा गंभीर आरोप आंबा व काजू बागायतदार संघटनेचा वतीने करण्यात आला. शेतकर्यांचा हिताच्या आड येणार्या तालुका कृषी व महसूल खात्याबाबत अनेक पुरावे हाती असून वरिष्ठांनी तातडीने दखल न घेतल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. देवगड येथील विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत काका ढोके, गणेश गावकर, नीरज घाडी, चंदन मामघाडी व अन्य बागायतदार उपस्थित होते. आंबा आणि काजू बागायतदारांना दर्जेदार कृषी औषधे मिळावीत, तसेच बोगस औषधांच्या विक्रीमुळे शेतकर्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आंबा-काजू बागायतदार संघटनेने कृषी विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. याच अनुषंगाने संघटनेच्या पदाधिकार्यांनी देवगड तालुका कृषी कार्यालयाला जुलैमध्ये भेट देऊन बोगस संजीवके व खत विक्रीबाबत माहिती देऊन खातरजमा करण्याबाबत मागणी केली होती. त्याप्रमाणे तालुक्यातील ५९ कृषी औषध विक्रेत्यांपैकी ५३ दुकाने सध्या सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाल्याचे संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी सांगितले.
कृषी औषध विक्रेत्यांच्या गोदामांची माहिती तसेच औषधांच्या साठ्याबाबतची सविस्तर माहिती संघटनेने मागितली आहे. ही माहिती तालुका कृषी कार्यालयात उपलब्ध नसल्याने जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असून, सोमवारी गोदामांबाबतची सविस्तर माहिती मिळण्याची अपेक्षा असल्याचे ढोके यांनी स्पष्ट केले. तसेच देवगड तालुका कृषी विभागाने या हंगामात कृषी औषधांचे १३ नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी तीन विक्रेत्यांच्या औषधांच्या नमुन्यांबाबत बोगस असल्याचे दर्शविणारे अहवाल उपलब्ध असल्याचा दावा संघटनेने केला. ३० दिवसा नंतर हा अहवाल प्राप्त होऊनही संबंधित विक्रेत्यांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याबद्दल ढोके यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर साधारण ३० दिवसांत अहवाल मिळतो. या कालावधीत संबंधित औषधांची विक्री रोखली पाहिजे, अशी मागणी संघटनेने केली आहे. अहवालात औषध निकृष्ट किंवा बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा फटका शेतकर्यांना बसू नये, यासाठी कृषी विभागाने योग्य ती खबरदारी म्हणून विक्री थबावण्याची गरज होती. मात्र ती न थांबवल्याने तालुक्यात बोगस औषधे गेल्या दोन महिन्यात विक्री करण्यात आली.यामध्ये तालुका कृषी विभागाचा साटेलोट पना दिसून येत आहे. संघटनेच्या आंदोलनाला कोणताही राजकीय हेतू नसून, शेतकर्यांच्या हितासाठीच हा लढा सुरू असल्याचे काका ढोके यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींकडून धमकीवजा भाषा वापरली जात असल्याचा आरोप करत, या प्रकाराची देवगड पोलिसांनी आणि पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी संघटना आवश्यकतेनुसार रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकर्यांनी कृषी औषधे खरेदी करताना संबंधित औषधाचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे का, याची विक्रेत्यांकडून खात्री करून घ्यावी. नमुना पाठवला असल्यास त्याचा अहवाल तपासूनच औषध खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन काका ढोके यांनी केले. कृषी औषध विक्रेत्यांच्या अधिकृत गोदामांची आणि अधिकृत वितरकांची माहिती मागितल्यानंतर ती माहिती संबंधित विक्रेत्यांपर्यंत कशी पोहोचली, असा प्रश्न उपस्थित करत गणेश गावकर यांनी कृषी विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा शेतकर्यांच्या हक्कांसाठी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नावरही गणेश गावकर यांनी भाष्य केले. संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आणि राजू शेट्टी यांच्या पाठिंब्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्यास मदत झाल्याचा दावा त्यांनी केला. नुकसानभरपाई वितरण प्रक्रियेत कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक यांच्या भूमिकेबाबतही काही पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल खाता मधील तलाठी मंडळ अधिकारी देखील शेतकरी दाखला,वारस तपास, खरेदी नोंदी बाबत मोठ्या रक्कमेची मागणी करत असून बाहेरून आलेल्या या कर्मचार्यांकडे ही संपत्ती आली कोठून या बाबत वरिष्ठांनी चौकशी करावी अशी मागणी केली असून. शेतकर्यांचा हितासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.