दापोली (प्रतिनिधी) - दापोलीला लाभलेल्या विस्तीर्ण आणि सुंदर समुद्रकिनार्यांमुळे सलग सुट्ट्या किंवा विकेंडला (शनिवार-रविवार) येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. कोकणचे मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाणारे दापोली हे पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली आदी भागातील लोकांचे पर्यटकांसाठीचे अगदी जवळचे आणि हक्काचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी समुद्र दर्शन होत नाही तेथील लोक समुद्राच्या ओढीने दापोलीतील स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनार्यांना पहीली पसंती देत असल्याने त्यांचे पाय पर्यटनासाठी दापोलीकडे वळतात त्यामुळे पर्यटनातून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. दापोलीत पर्यटनातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली असल्याने पर्यटन व पर्यटन आधारीत व्यवसायांच्या वृध्दीला बळकटी देवून दापोलीतील स्वयंरोजगारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे येथील पर्यटन व्यवसाय धोक्यात येतील असे विनाशकारी प्रकल्प वा उदयोग आणून दोन चार धनिकांच्या फायद्यासाठी येथील पर्यटन व्यवसायाचे अधःपतन होईल, असे निर्णय घेऊन पर्यटन व्यवसायाचा बट्ट्याबोळ करू नये.
कारण शासनाच्या सहकार्याशिवाय स्थानिकांनी उभारलेल्या पर्यटन व्यवसायावर संक्रांत येईल आणि येथील लोकांची आहे ती रोजीरोटी हिसकावली जाईल, असे निर्णय घेतले गेले नाही पाहिजेत. दापोली आणि एकंदरीतच कोकणच्या निसर्गरम्य पट्ट्यामध्ये पर्यटनाने स्थानिक अर्थव्यवस्थेला एक मोठी उभारी मिळाली आहे. शासनाच्या कोणत्याही मोठ्या अनुदानाशिवाय किंवा मदतीशिवाय येथील स्थानिक लोकांनी आपल्या मेहनतीवर, होमस्टे, हॉटेल्स, खानावळी आणि स्थानिक पर्यटनाचे छोटे-मोठे व्यवसाय बॅका , पतपेढया आदी विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज काढून उभे केले आहेत. दापोलीचे वैभव येथील समुद्रकिनारे, हिरवळ आणि प्रदूषणमुक्त वातावरण आहे. जर येथे पर्यावरणाचा र्हास करणारे किंवा प्रदूषण वाढवणारे विनाशकारी उद्योग आले तर निसर्गाचे नुकसान होईलच पण सोबतीने पर्यटकांचा ओघही पूर्णपणे थांबेल. मोजक्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेकडो स्थानिक लोकांचा हक्काचा स्वयंरोजगार धोक्यात आणणे हे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या चुकीचे आहे.
दापोलीला गरज आहे ती पर्यटनपूरक पायाभूत सुविधांची (रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता), ना की निसर्गाचा विनाश करणार्या प्रकल्पांची. स्थानिक संस्कृती, पर्यावरण आणि रोजगार टिकवून ठेवत विकास साधणे हाच दापोलीच्या भविष्यासाठी योग्य मार्ग ठरू शकतो. सलग जोडून सुट्ट्या आल्या कि पर्यटकांची पावले दापोलीतील समुद्र किनार्यावर वळतातच पण काही पर्यटक गर्दी टाळण्यासाठी सुट्टीचे दिवस वगळता ईतर दिवशीही समुद्र किनार्यावर पर्यटक पोहोचतात त्यामुळे दापोलीतील पर्यटन व्यवसाय चांगलाच बहरला आहे. त्यातून रोजगार निर्मिती झाली असून येथील बर्यापैकी लोकांच्या हाताला काम मिळाले आहे. तर पर्यटन व्यवसायावर आधारित विविध उत्पादित मालाला खर्याअर्थाने बाजारपेठ मिळाली आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे दापोली सारख्या निसर्गरम्य अशा सुंदर ठिकाणाचे एकुणच सृष्टी सौंदर्य नष्ट होवून त्याचा थेट परिणाम हा पर्यटन व्यवसायाला होईल असे कोणतेही निर्णय घेण्यात येवू नयेे, असे स्थानिकांतून सांगण्यात येत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.