loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील जंगलतोडीला आळा कधी?, बेकायदा वृक्षतोडीच्या तक्रारींनी वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

संगलट (प्रतिनिधी) - कोकणातील डोंगररांगा आणि जंगलांमध्ये बेकायदा वृक्षतोड सुरू असल्याच्या तक्रारी वाढत असून, या प्रकारांवर प्रभावी कारवाई कधी होणार, असा सवाल पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील नांदगाव पासून ते पन्हाळजे परिसरात दिवसाढवळ्या झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच दापोली तालुक्यातील टेटवली, वाकवली, पिसई कोंडे भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रात्री दहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात सागाची तोड करत असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड, दापोलीपासून कोकणातील विविध भागांत जंगलतोडीच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी स्थानिक शेतकरी किंवा जमीनमालकांना आर्थिक आमिष दाखवून झाडांची तोड करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीने वृक्षतोड करणार्‍या ठेकेदारांचे जाळे वाढत असल्याचेही सांगितले जात आहे. कोकणातील जंगलसंपदा ही केवळ लाकडाचा स्रोत नसून, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि डोंगर-उतार स्थिर ठेवणे यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सदरचे लाकूडसम्राट त्यांच्या ठराविक लाकडू चक्कीवर सागासारखी लाकडे टाकली जात जावून त्याच ठिकाणी देवाणघेवाण होत असल्याची चर्चा होत आहे. मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड झाल्यास डोंगर उताराची स्थिरता कमी होऊन अतिवृष्टीच्या काळात भूस्खलनाचा धोका वाढू शकतो.

टाईम्स स्पेशल

पुणे जिल्ह्यातील माळीण येथे २०१४ मध्ये झालेली भीषण भूस्खलनाची दुर्घटना आजही अंगावर काटा आणणारी आहे. या दुर्घटनेत मोठ्याप्रमाणावर जीवितहानी झाली होती. डोंगर उतारावरील मानवी हस्तक्षेप, भौगोलिक परिस्थिती आणि अतिवृष्टी यांसह विविध कारणांचा अशा घटनांशी संबंध असू शकतो. त्यामुळे डोंगराळ भागातील अनियंत्रितवृक्षतोड आणि रस्ते अथवा इतर बांधकामांसाठी होणारा हस्तक्षेप याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कोकणातील जंगलांचे संरक्षण करण्यासाठी बेकायदा वृक्षतोडीच्या तक्रारींची तातडीने चौकशी करावी, संबंधित परवानग्यांची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg