loader
Breaking News
Breaking News
Foto

अवैध दारूसाठ्यावर पोलिसांची कारवाई; ४,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

दापोली (वार्ताहर) : रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दापोली तालुक्यातील टांगर, गावठणवाडी येथे करण्यात आली. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र चंद्रकांत मयेकर (वय ४७, रा. टांगर, गावठणवाडी, ता. दापोली) यांच्या किराणा मालाच्या दुकानाच्या एका भिंतीच्या आडोशाला ठेवलेला ४ हजार ६४० किमतीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कारवाईत देशी दारू संत्रा जी.एम. ९० मिलीच्या ४४ प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या, प्रत्येकी ४० रुपये किमतीच्या, तसेच लंडन प्लिसनर बिअर ६५० मिलीच्या १६ काचेच्या सिलबंद बाटल्या, प्रत्येकी १८० रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत संशयित राजेंद्र चंद्रकांत मयेकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हेड कॉनस्टेबल योगेश शेट्ये यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg