loader
Breaking News
Breaking News
Foto

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या राजकीय नेत्यांना दिवाळीनिमित्त सदिच्छा भेटी; भास्कर जाधवांसोबत फराळाचा आनंद

चिपळूण (ओंकार रेळेकर) - दिवाळीच्या निमित्ताने चिपळूणच्या राजकीय वर्तुळात सदिच्छा भेटींचा सिलसिला पाहायला मिळत आहे. चिपळूण नगरपालिकेचे शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन उमेश सकपाळ यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आमदार जाधव यांच्यासोबत दिवाळीच्या फराळाचाही आस्वाद घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि माजी आमदार रमेश कदम यांचीही त्यांनी सदिच्छा भेट घेतली. या सर्व नेत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले.पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सणाच्या निमित्ताने झालेल्या या भेटींची चिपळूणच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.यावेळी बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, गटनेते अंकुश आवले आणि नगरसेवक गणेश आग्रे आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg