कळझोंडी : शासकीय योजना आणि प्रशासकीय मदतीची वाट पाहत न बसता, रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावातील ग्रामस्थांनी "जनहित फाउंडेशन, महाराष्ट्र" यांच्या सहकार्याने दुष्काळावर मात करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत श्रमदानातून आणि लोकसहभागातून गावातील तीन विविध वाड्यांमध्ये नैसर्गिक बंधारे बांधून पाणी टंचाईच्या समस्येला कायमची खीळ घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कळझोंडी गावातील सडेवाडी, वीरवाडी आणि लोहारवाडी या तीन दुर्गम आणि पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या ठिकाणी हे नैसर्गिक बंधारे बांधण्यात आले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात या वाड्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने अखेर गावकऱ्यांनी स्वतःच या समस्येवर उत्तर शोधण्याचे ठरवले.
या मोहिमेला 'जनहित फाउंडेशन, महाराष्ट्र' या संस्थेने मोलाची साथ दिली. संस्थेचे संस्थापक प्रथमेश गोपाळ गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावातील असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत या बंधाऱ्यांचे काम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले. "जिथे सरकारी यंत्रणा आणि प्रशासन पोहोचण्यात अपयशी ठरते, तिथे जनतेची वज्रमूठ काय करू शकते, याचे जिवंत उदाहरण कळझोंडी गावाने दाखवून दिले आहे. गावकऱ्यांचा हा स्वावलंबी निर्णय आणि हे कौतुकास्पद कार्य आज संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला एक नवी दिशा दाखवणारे ठरेल," असा विश्वास याप्रसंगी बोलताना जनहित फाउंडेशनचे संस्थापक प्रथमेश गावणकर यांनी व्यक्त केला.
या बंधाऱ्यांमुळे परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून, आगामी उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. "आता आपणही आपली सामाजिक जबाबदारी ओळखण्याची वेळ आली आहे," अशी भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून कौतुक होत असून, कळझोंडीचा हा 'कळझोंडी पॅटर्न' इतर गावांनीही राबवावा, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.






















_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.