loader
Breaking News
Breaking News
Foto

जयंतराव पाटील यांनी दोडामार्ग येथे सुरेशभाई दळवी यांची भेट घेत केली तब्येतीची विचारपूस

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य विधिमंडळ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आम. जयंतराव पाटील हे गुरूवारी सासोली गावातील ग्रामस्थांच्या जमीन संदर्भात पाहणी करण्यासाठी दोडामार्गमध्ये आले असता त्यांनी दोडामार्ग तालुक्यातील लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशभाई दळवी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सुरेशभाई दळवी यांची तब्येत ठिक नाही हे समजल्यावर त्यांनी प्रथम दळवी यांची भेट घेऊन नंतर सासोली येथे रवाना झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग येथे सुरेशभाई दळवी यांच्या कार्यालय ठिकाणी सुरेशभाई दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप चांदेलकर, ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गुणाजी गवस यांनी देखील स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांचे देखील स्वागत करण्यात आले. दोडामार्ग येथे जयंतराव पाटील यांच्या स्वागतासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व बाबुराव धुरी, कार्यकर्ते संदीप गवस, सुदेश तुळसकर, उल्हास नाईक, गौतम महाले, संतोष मोर्ये, नगरसेवक रामराव गावकर, मदन राणे, सिध्देश कासार, भिवा गवस, सिध्देश राणे, इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जयंतराव पाटील यांनी जंगली वन्य प्राणी, तसेच आडाळी औद्योगिक वसाहत, तसेच वृक्षतोड, खाजगी वन जंगल राखीव जंगल संदर्भात माहिती घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg