loader
Breaking News
Breaking News
Foto

नवरात्रीमध्ये श्री सालबाई देवीच्या दसर गवर कार्यक्रमात भक्तांच्या आनंदाला आले उधान...! श्रद्धेने केली जाते पूजा

आबलोली (संदेश कदम) - श्री सालबाई देवी प्रसन्न निवातेवाडी नं.१ विकास मंडळ खोडदे (रजि.) तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे नवरात्रीमध्ये भक्तांच्या आनंदाला उधान...! आले असून दसर गवर कार्यक्रम जल्लोषात, उत्साहात आणि अतिशय शांततेत नऊ ते दहा दिवस साजरा होतो. या उत्सवाचे वैशिष्ट्‌य म्हणजे अतिशय प्रसन्न वातावरणात येथे देवीची आराधना पूजाअर्चा केली जाते. श्री सालबाई देवीचा ऐतिहासिक निर्णय म्हणजे येथील ग्रामस्थ नऊ ते दहा दिवस देवीची सेवा करताना कुठल्याही प्रकारचे मद्यपान करत नाहीत किंवा तसे देवीला चालत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या दोन वर्षात घडलेली एक घटना की, एक तरुण मध्य प्राशन करून देवीच्या देवळात नाचत होता. देवीने म्हणजे ज्या मुलीच्या अंगात दसर गवर येते. तिने त्या मध्यपी तरुणाला कार्यक्रम थांबवून देवळाच्या बाहेर जायला सांगितले. ग्रामीण भागात वसलेले हे देऊळ अतिशय शांतता प्रिय निसर्गरम्य वातावरणात असून श्री सालबाई देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती दूरवर पसरलेली आहे. या देवीचा नवस फेडण्यासाठी भक्त दूरवरून या ठिकाणी येत असतात.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg