loader
Breaking News
Breaking News
Foto

सांगुळवाडीत पंडित दीनदयाळ उपाध्याय महाकुंभ रोजगार मेळावा संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील होतकरू गरजू सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. शासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले. ​शहीद विजय साळसकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैभववाडी आणि श्री अनगरसिद्ध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगुळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन सांगुळवाडी येथे करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे तसेच वैभववाडी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ​या मेळाव्यास पंचायत समिती वैभववाडीच्या उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद राणे, पंचायत समिती सदस्या सुवर्णा संसारे, राजेंद्र राणे, संस्थेचे संदीप पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. ​शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून वैभववाडी तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg