loader
Breaking News
Breaking News
Foto

देवली गावात लोकसहभागातून १० वनराई बंधारे पूर्ण, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपक्रम

मालवण (प्रतिनिधी) - कमी पावसामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशावेळी वाहून जाणारे पाणी हे वनराई बंधाऱ्यांमुळे अडवून जमिनीत मुरण्यास मदत होणार आहेच शिवाय भूजल पातळी वाढून ऐन उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी होईल, असे प्रतिपादन देवली गावचे सरपंच श्री. श्याम वाक्कर यांनी येथे बोलताना केले. आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्र समस्या भेडसावण्याची शक्यता लक्षात घेता देवली ग्रामपंचायतीने पाणी संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देवली ग्रामपंचायतीने गावात एकूण २० वनराई बंधारे घालण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या मोहिमेचा प्रारंभ वरचीवाडी येथून ज्येष्ठ नागरिक भाई चव्हाण यांच्या हस्ते बंधारा बांधून करण्यात आला. याप्रसंगी सरपंच श्याम वाक्कर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सूरज बांगर, ग्रामपंचायत सदस्य सचिन मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ घंटे, आरोग्य सहायक सुनील चव्हाण, संजय कडू, आरोग्य सेवक विठ्ठल गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष रामू चव्हाण, ग्रामसंघ अध्यक्ष संजना आचरेकर, ज्येष्ठ नागरिक साबाजी परब यांच्यासह अंगणवाडी सेविका पूनम परब आणि मीनाक्षी चव्हाण, सीआरपी दिक्षा देऊलकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

गेल्या दोन दिवसांत वरचीवाडी, गव्हाणवाडी, खालचीवाडी आणि परबवाडी या चार वाड्यांमध्ये ग्रामस्थांच्या श्रमदानातून १० बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत. या उपक्रमात गावातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्र येत श्रमदान करून बंधारे उभारणीचे काम पूर्ण केले. गेल्या तीन चार दिवसात देवली गावातील ग्रामस्थानी एकत्र येत श्रमदान करून बंधारे उभारणीचे काम पूर्ण केले. उरलेले १० वनराई बंधारेदेखील लवकरच लोकसहभागातून पूर्ण केले जातील, अशी माहिती सरपंच श्याम वाक्कर यांनी दिली. देवली ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg