संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - "मुका प्राणी असला म्हणून काय झाले? शेवटी तोही एक जीवच आहे ना!" हीच भावना उराशी बाळगून कर्तव्यावर असतानाही एका मुक्या जिवासाठी महामार्गावर थांबलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज चव्हाण यांच्या संवेदनशीलतेची सध्या संगमेश्वर परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री येथे जखमी घोरपडीला वाचवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आणि दुर्दैवाने मृत्यू झाल्यानंतरही तिला दिलेला सन्मानाचा निरोप, यातून खाकी वर्दीतील माणुसकीचा आणि करुणेचा आदर्श वस्तुपाठ समोर आला आहे. वाहतूक शाखेत चालक म्हणून कार्यरत असलेले सूरज चव्हाण हे आपले इंटरसेप्टर वाहन घेऊन महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जात होते. कर्तव्यावर जात असताना वांद्री येथे महामार्गाच्या मध्यभागी एका जखमी घोरपडीवर त्यांची नजर पडली. भरधाव धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीत तो मुका जीव अत्यंत वेदनेत आणि अगतिकतेने मृत्यूशी झुंज देत होता.
अनेकदा अशा प्रसंगी नागरिक किंवा वाहनधारक दुर्लक्ष करून पुढे निघून जातात. मात्र, "मुका प्राणी असला म्हणून काय झाले, शेवटी तोही एक जीवच आहे" ही संवेदनशील जाणीव मनात ठेवून चव्हाण यांनी क्षणार्धात आपले वाहन रस्त्याकाठी थांबवले. सूरज चव्हाण यांनी तातडीने खाली उतरून त्या जखमी प्राण्याला पाणी पाजण्याचा व त्याचा जीव वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. प्राण्याचा श्वास टिकून राहावा म्हणून त्यांनी सर्वतोपरी धडपड केली. परंतु, अपघातातील गंभीर दुखापतीमुळे तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्या मुक्या प्राण्याची प्राणज्योत मालवली. जीव वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे पाहून चव्हाण अत्यंत हळहळले. मात्र, प्राणाचा अंत झाला तरी त्या मृतदेहाला रस्त्यावरच वाहनांच्या चाकाखाली तुडवले जाऊ द्यायचे नाही, हा ठाम विचार त्यांच्या मनात आला.
सूरज चव्हाण यांनी त्या मुक्या प्राण्याला रस्त्यावरून सुरक्षित बाजूला घेतले. त्यानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन रस्त्याच्या कडेला खड्डा खोदला आणि घोरपडीचे सन्मानाने दफन केले.कायद्याची कठोर अंमलबजावणी करणाऱ्या खाकी वर्दीच्या आत एक अत्यंत हळवे आणि संवेदनशील मन धडधडत असते, याचाच प्रत्यय या प्रसंगाने उपस्थितांना आणून दिला. कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धीचा मोह न बाळगता केवळ एका मुक्या प्राण्याप्रती असलेल्या करुणेपोटी हेड कॉन्स्टेबल सूरज चव्हाण यांनी हे कार्य केले. माणूस असो वा मुका प्राणी, प्रत्येक सजीवाच्या जिवाला मोल असते हा संदेश त्यांच्या या कृतीतून मिळतो.आपले मूळ कर्तव्य बजावत असतानाच एका मुक्या प्राण्यासाठी दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकी खरोखरच कौतुकास्पद असून सूरज चव्हाण यांच्या या संवेदनशील कार्याचे जोरदार कौतुक होत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.