loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! शासनाकडून ₹391 कोटींचा निधी मंजूर!

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दिवाळीपूर्वी वेतन देण्याचा दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला सप्टेंबर 2026 मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी ₹391.02 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 27 ऑक्टोबर 2027 रोजी निर्गमित झाला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एसटी महामंडळातील सुमारे 83 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणतः दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा 6 नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळावे, यासाठी मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने पाठपुरावा केला. एसटी महामंडळाच्या प्रवासी सवलत योजनांपोटी शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेला महामंडळाच्या आर्थिक नियोजनात महत्त्वाचे स्थान आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींची अंमलबजावणी करताना महामंडळावर मोठा आर्थिक भार येतो. या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी निधी वेळेत उपलब्ध झाल्यास महामंडळाच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यास मदत होते.

टाइम्स स्पेशल

शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीपूर्व वेतनासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर आर्थिक अडचणींचे सावट पडू नये, यासाठी शासन आणि एसटी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली होती.“एसटी ही केवळ परिवहन सेवा नसून महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या सेवेला अहोरात्र कार्यरत ठेवणारे अधिकारी आणि कर्मचारी हे महामंडळाचे खरे बळ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता एसटी प्रशासनाने वेतन वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी,” अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg