loader
Breaking News
Breaking News
Foto

आधुनिक शेती अवजारे व अळंबी उत्पादनाबाबत सोवेली येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दापोली (वार्ताहर) : ग्रामीण जीवन कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत सोवेली येथील फणसे सभागुह येथे “शेतीत यांत्रिकीकरणाचे महत्त्व, विद्यापीठाद्वारे विकसित केलेली विविध यंत्र व अवजारे आणि मशरूम उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील , कृषी अभियांत्रिकी आणि वनस्पती रोग शास्त्र विभागाचे मार्गदर्शन शेतकरी पुरुष व महिला वर्गासाठी करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ‘वसुंधरा व मृदगंध, (सोवेली) 'कृषी कन्या’ (भाटघर), तसेच ‘बीजांकुर (मुगिज) या विद्यार्थी गटांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्राचा लाभ परिसरातील ४० हून अधिक शेतकरी व ग्रामस्थांनी घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रमुख मार्गदर्शक डॉ. एस. व्ही. पाठक यांनी उपस्थितांना भात शेती आणि शेतीतील इतर कामाकरीता लागणारे यंत्र व अवजारे याबाबत मार्गदर्शन केले.विद्यापीठाने विकसित केलेल्या वैभव विळा,अतुल चिकू झेला व नूतन आंबा काढणी यंत्र, अमर बांडगुळ कटर,अंकुर दातेरी फावडे , पंकज पडलर,कोनो वीडर, सुपारी सोलणी व काजू कटर, सुलभ कंटूर मार्कर या यंत्राबाबत सविस्तर माहिती दिली. या आधुनिक अवजारांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि उत्पादन खर्चात बचत होऊन शेतीची कार्यक्षमता वाढते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वनस्पती रोग शास्त्र विभागाचे डॉ. एस. सी. रिठे यांनी मशरूम (अळंबी) उत्पादन तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन केले. अळंबीचे प्रकार व ओळख आणि उत्पादन प्रक्रिया याची सविस्तर माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

मशरूम उत्पादन हा कमी भांडवल व कमी जागेत करता येणारा उत्तम पूरक व्यवसाय असून, यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विविध अवजारांचे नमुने दाखवण्यात आले. अवजारांचा वापर कसा करावा हे छायाचित्रे चलनचित्रांद्वारे शेतकऱ्यांना माहिती करून देण्यात आले. मार्गदर्शन सत्रानंतर उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. आयोजकांनी मार्गदर्शक, मान्यवर आणि उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास सहाय्यक दिपक रेवाळे हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg