loader
Breaking News
Breaking News
Foto

मठ येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात; १८ रक्तदात्यांचे रक्तदान

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - ‘माझं गाव – आरोग्यसंपन्न गाव’ व ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर, जावडेच्या आरोग्य उपकेंद्र मठ येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. श्री भवानी सोमेश्वर विश्वस्त मंडळ, मठ, ग्रामपंचायत मठ, आरोग्य उपकेंद्र मठ आणि श्री स्वामी समर्थ रक्तपेढी, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे, पंचायत समिती सदस्या दीपाली साळवी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दिवाकर गुणे, सुभाष पवार, संतोष अडबल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण १८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. उपस्थित ग्रामस्थांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ईसीजी (ECG) तपासणी आणि स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमातून ग्रामस्थांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच रक्तदान व आरोग्य जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या वेळी आयुष्यमान आरोग्य मंदिर, जावडेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री हेडाऊ, आरोग्य सहाय्यक आझाद विचारे, LHV प्रज्ञा कदम, ग्रामसेवक समीर गमरे, ANM अरुणा वाघाटे, MPW विश्वजित काळे, सतीश कांबळे व मोतीलाल वाघ, फ्लेबोटोमिस्ट प्रतीक्षा जाधव, रुग्णवाहिका चालक नितीन चव्हाण, आशा स्वयंसेविका रविना गिडीये, साक्षी लोकम, नलिनी शिंदे व सपना गांगरकर, माजी सरपंच वैष्णवी साळवी, मदतनीस सुगंधा साळवी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg