loader
Breaking News
Breaking News
Foto

साटवली गढीवर स्वच्छता मोहीम; शिवगंध प्रतिष्ठान आणि श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजाच्या स्वयंसेवकांचा सहभाग

लांजा (संजय साळवी) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साटवली गढीच्या ठिकाणी शिवगंध प्रतिष्ठान लांजा आणि श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने या गढीने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने - आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजाविणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयास आलेले तालुक्यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढीकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने सद्य:स्थितीत ही गढी अखेरची घटका मोजत आहे. लांजा तालुक्यातील ऎतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या गढिचे संवर्धन व्हावे व वर्तमान पिढीला तालुक्याचा समृद्ध वारसा ज्ञात व्हावा यादृष्टिने, शिवगंध प्रतिष्ठान, लांजा आणि श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने साटवली किल्ला संवर्धनाच्यादृष्टीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

टाईम्स स्पेशल

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. राहुल मराठे यांनी स्वतः उपस्थित राहून मोलाचे सहकार्य आणि श्रमदान केले. तसेच यासाठी येथील ॲड. ओमकार गांगण यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. शिवगंध प्रतिष्ठान, लांजातर्फे आयोजित 'शिवकालीन साटवली गढी स्वच्छता मोहीम' अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पडली. या स्वच्छता मोहिमेमुळे साठवली गढीने मोकळा श्वास घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg