loader
Breaking News
Breaking News
Foto

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ - भरणे येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान

भरणे, खेड (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत अंगणवाडी केंद्र शिंदेवाडी, बाईतवाडी भरणे ता. खेड येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान सोहळा तसेच लहान मुलांना दैनंदिन उपयोगी वस्तूंचे वाटप भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी बोलताना अ‍ॅड. वैभव खेडेकर म्हणाले, अंगणवाडी सेविका म्हणजे निस्वार्थ सेवेचं दुसरं नाव आहे. कमी मानधनातही दिवस-रात्र त्या बालकांच्या पोषण, आरोग्य आणि मातांच्या काळजीसाठी झटत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला, तर अंगणवाडीतील चिमुकल्यांना दैनंदिन उपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याला खेड नगर परिषदेच्या नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली राकेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, भाजपा ओबीसी महिला मोर्चा खेड शहराध्यक्ष माया गुहागरकर, भाजपा महिला मोर्चा खेड शहर चिटणीस ममता दांडेकर, संजीवनी शेलार, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संदेश भुवड, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय तोडकरी, विनायक शिरगावकर, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, मनोज दांडेकर, प्रदीप भोसले यांच्यासह अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg