loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था; खेळाडूंच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर!

म्हसळा : तालुक्यातील खेळाडूंना सरावासाठी हक्काचे मैदान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या म्हसळा तालुका क्रीडा संकुलाची सध्या दुरवस्था झाली आहे. संपूर्ण मैदानावर ३ ते ४ फूट उंच झुडपे व गवत वाढल्याने मैदानाला रानाचे स्वरूप आले आहे. त्यातच खिडक्यांच्या काचा संपूर्ण फुटलेल्या अवस्थेत असून,पाण्याची पुरेशी सोय नसल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे. म्हसळा तालुक्यातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत तालुका व जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत असताना मेहनत करत असताना, सरावासाठी असलेल्या क्रीडा संकुलाची ही अवस्था चिंताजनक आहे. मैदानाच्या देखभालीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ उर्मिला विलास करडे यांनी उपस्थित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मैदानावरील झुडपे हटवून स्वच्छता कधी केली जाणार? पाण्याची सुविधा कधी उपलब्ध होणार? अत्यंत पडीक इमारती सारखी अवस्था तालुका क्रीडासंकुलाची झाली आहे ही बाब तालुक्यातील क्रीडाप्रेमिंसाठी अतिशय चिंताजनक आहे आणि खेळाडूंना या मैदानाचा नियमित वापर कधी करता येणार? या प्रश्नांची उत्तरे संबंधित प्रशासनाने द्यावीत. म्हसळा तालुका क्रीडा संकुलाची तातडीने स्वच्छता करून मैदान खेळण्यायोग्य करावे, पाण्याची योग्य व्यवस्था करावी आणि खेळाडूंना आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात येत आहे. या विषयावर युवासेनेचे तालुका अधिकारी करडे यांनी तालुक्यातील खेळाडूसाठी अग्रेसर भूमिका घेतली असून या समस्या दूर झाल्या नाहीत तर यावर प्रशासनाला शिवसेना स्टाईलने खेळाडूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आंदोलन करणार, असा इशाराच प्रशासनाला दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg