loader
Breaking News
Breaking News
Foto

आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने आयुक्त पनवेल यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्याबाबत केली चर्चा

पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिका हद्दीतील वाघर्‍याची वाडी, टेंभोडे, सागवाडी, वळवली येथील आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी, रस्ता तसेच इतर मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणी संदर्भात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान आयुक्तांनी संबंधित विभागीय अधिकारी व कर्मचार्‍यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देत आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, रस्ता, तसेच इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित विभागीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कामात कामचुकारपणा अथवा हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई आणि तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश आयुक्त यांनी शिष्टमंडळा समोर दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भेटीस आदिवासी बांधवांसह जनहक्क अधिकार संघर्ष आणि प्रहार संघटनेचे सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. आदिवासी बांधवांच्या मूलभूत हक्कांसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी बैठकीत आयुक्त यांनी वैभव विधाते (उप आयुक्त) यांना यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच बैठकीत संबधित बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन आदिवासी वाड्यांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्यात ही भावना आदिवासी बांधव व महिलांनी व्यक्त केली. यावेळी बैठकीत संतोष चाळके (संस्थापक अध्यक्ष, जनहक्क अधिकार संघर्ष सामाजिक संस्था), डॉ. सुनील शिरीषकर (प्रहार संघटना अध्यक्ष रायगड जिल्हा), परेश लोंढे, अजय कदम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg