loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस, बाजारपेठामध्ये व्यापाऱ्यांची तारांबळ

रत्नागिरी (टाइम्स डिजिटल नेटवर्क): रत्नागिरी शहर परिसरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे, त्यामुळे बाजारपेठा दिवाळीच्या साहित्य विक्रीसाठी सज्ज आहेत; नागरिक देखील आज रविवार असल्याने मोठ्या संख्येने खरेदीसाठी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये दिसून आले. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच दिवाळीसाठी कंदील विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची अचानक आलेल्या अवकाळी पावसाने धावपळ उडाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हवामान खात्याने नोव्हेंबर महिन्यात एल निनो चा प्रभाव अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता दोन दिवसांपासून वर्तवली आहे. आज एक नोव्हेंबर रात्री नऊ वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाच अवकाळी पाऊस पडला तर हातातोंडाशी आलेल्या भात शेतीचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात आणखीनच उष्मा वाढला आहे.

टाइम्स स्पेशल

सध्या हिवाळा सुरू आहे, त्यामुळे पहाटेपासून थंडी ग्रामीण भागात जाणवत आहे, अशातच अवकाळी पाऊस सुरू झाल्याने थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता देखील शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. आंबा काजू पिकाला अवकाळी पाऊस पोषक असल्याचे म्हटले जाते. यंदा दुष्काळाचे संकट सुरू असताना येत्या 2017 मध्ये त्याची तीव्रता अधिक राहणार आहे, मात्र या महिन्यात पाऊस असाच पडत राहिला तर ग्रामीण भागात बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचून त्याचा निश्चितच जनतेला उपयोग होईल असे म्हटले जाते. विजांचा कडकडाट सुरू असल्याने नागरिकांनी घरातच थांबणे असल्याचे जाणकार सांगत आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस आज पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

अनेक भागात वीज खंडित

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg