मालवण (प्रतिनिधी) - अरुंद रस्त्यांमुळे तारकर्ली, देवबाग तसेच परिसरातील प्रवासी, विद्यार्थी आणि पर्यटकांना एसटी वाहतुकीच्या समस्यांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मालवण आगाराला किमान पाच मिडी बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सुखाजी बापर्डेकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तारकर्ली हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे गाव असून येथे वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. तारकर्ली ते देवबाग मार्गावरील रस्ता काही ठिकाणी अरुंद असल्याने मोठ्या एसटी बसेसना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा मोठी बस देवबागपर्यंत पोहोचत नाही, तर काही वेळा फेरीमध्ये बदल किंवा फेरी रद्द होण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटकांची मोठी गैरसोय होते.
तारकर्ली, वायरी, काळेथर, भूतनाथ, देवली, दत्तमंदिर तसेच विठ्ठल मंदिर-देवबाग परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मालवण येथे शिक्षण, बाजारपेठ, विविध कामे व इतर गरजांसाठी ये-जा करतात. सकाळी शाळा-महाविद्यालयाच्या वेळेत आणि सायंकाळी परतीच्या वेळेत मिडी बसच्या नियमित फेऱ्या सुरू झाल्यास विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. तारकर्ली मार्गावर पूर्वीप्रमाणे मिडी बस उपलब्ध करून देण्याबाबत गेल्या चार वर्षांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने निवेदने देत असल्याचे बापर्डेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात दुर्गम भागांसाठी २८ आसनी मिडी बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर तारकर्ली परिसरासाठीही या बसचा उपयोग करावा, अशी मागणी सुरेश बापर्डेकर यांनी केली आहे. मालवण आगारातून बाजारपेठ मार्गे तारकर्ली व देवबागपर्यंत सकाळी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार मिडी बसच्या किमान चार फेऱ्या सुरू कराव्यात, तसेच मालवण आगाराला पाच मिडी बस कायमस्वरूपी उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. मिडी बसमुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि व्यापारी यांची वाहतूक सुविधा सुधारण्याबरोबरच एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. त्यामुळे याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन मालवण आगाराला मिडी बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सुरेश बापर्डेकर यांनी केली आहे.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.