गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे माजी सरपंच व प्रशासक जनार्दन पांडुरंग आंबेकर यांनी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे तसेच रत्नागिरी जिल्ह्या परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे यांना रितसर पत्र पाठवून राज्यातील मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक लवकरात लवकर घेण्यातह यावी तसेच माजी सरपंच व प्रशासक यांचे थकित मानधन त्वरित देण्यात यावे या बाबतची मागणी केली आहे. जनार्दन आंबेकर यांनी पाठवलेल्या पत्रात असेही नमूद केले आहे की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरात सुमारे ३,५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींची ५ वर्षांची मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये संपलेली असून ग्रामपंचायतींची पुढील निवडणूक होई पर्यंत तेथे सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. एकटय़ा गुहागर तालुक्यातील ६६ पैकी २९ + आधीचे १० अशा एकूण ३९ ग्रामपंचायतींमध्ये अशाच प्रकारे प्रशासकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
सुरुवातीला फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या माजी सरपंचांना सहा महिने म्हणजे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रशासक म्हणून मुदत वाढ देण्यात आली होती. त्या नंतर १ सप्टेंबर २०२६ पासून शासकीय अधिकाऱ्यांची (कृषी विभागातील कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी) यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर एक महिन्यात १ ऑक्टोबर २०२६ पासून पुन्हा शाळेच्या केंद्र प्रमुखांची तर काही पर्यवेक्षिकांची मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीं मध्ये प्रशासक म्हणून नव्याने नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. अशा वारंवार प्रशासकांच्या नेमणूका होत असल्यामुळे ग्रामपंचायतींची बॅंक खाती अनेक वेळा बदलावी लागत आहेत. त्यामुळे वेळ जातो व ग्रामपंचायतींच्या नियमित कामकाजात अडचणी येत आहेत. शासन आदेशानुसार, सद्या तर ज्यांना ग्रामपंचायत क्षेत्रातील कामकाजाचा काडीचाही अनुभव नाही, अशा शाळेच्या केंद्र प्रमुखांची ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून नेमणूक केल्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या विविध विकास कामांसाठी अडथळा निर्माण होत आहे.वास्तविक, केंद्र प्रमुखांनी आता ग्रामपंचायत सांभाळायची म्हणजे शाळा सांभाळायची नाही का ? हे काय केंद्र प्रमुखाचे काम नाही. वास्तविक केंद्र प्रमुखांनी शाळेची गुणवत्ता सुधारली पाहिजे, त्यासाठी त्यांची नेमणूक झालेली आहे. ग्रामपंचायतचे प्रशासक म्हणून त्यांना काम देणे कितपत योग्य आहे ? त्या पेक्षा शासनाने लवकरात लवकर मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेऊन अशा वरचेवर प्रशासकांच्या कराव्या लागणाऱ्या नेमणुकांवर कायमचा तोडगा काढावा. शिवाय नेमणूक झालेल्या शासकीय प्रशासक संबंधित ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहातच नाहीत. तर नेहमीच्या आवश्यक कागदपत्रांवर, प्रस्तावांवर तसेच ग्रामस्थांना आवश्यक असलेल्या दाखल्यांवर त्यांच्या सह्या घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्रामपंचायत कर्मचारी यांना त्यांच्या कार्यालयात (केंद्रस्थानी) बोलावून घेतले जाते किंवा ते कुठे आहेत तेथे जावे लागते आहे. त्यामुळे ग्राम विकासाला अनेक अडचणी येत आहेत.
शासनाकडून सुरुवातीला नेमणूक केलेल्या प्रशासकांचे (माजी सरपंचांचे), त्यांनी केलेल्या सहा महिन्यांच्या ( १ मार्च २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६) कामांचे योग्य मानधन कसे व कुठून द्यायचे ? किती द्यायचे ? या बद्दल योग्य ते निर्देश शासना कडून संबंधित पंचायत समितीला दिलेले नसल्यामुळे माजी सरपंच व प्रशासक यांचे मानधन देणे अजूनही प्रलंबित आहे. शासकीय प्रशासकांना, ५% मानधन दिले जाते. मग आम्हां माजी प्रशासकांच्या मानधनाबाबत एवढी दिरंगाई का ? वास्तविक शासनाने माजी सरपंच व प्रशासक यांचे थकित मानधन देऊन त्यांनाच पुन्हा योग्य मानधन देऊन ग्रामपंचायतींच्या निवडणूक होई पर्यंत प्रशासक म्हणून नेमणूक केली असती तर त्यांनी आनंदाने स्विकारली असती. कारण ते गावातील स्थानिक नागरिक आहेत व ग्रामपंचायतींच्या नियमित कामकाजाची त्यांना चांगली माहिती आहे असेही जनार्दन आंबेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. सदर बाबतीत आपण योग्य तो मार्ग काढून सर्व माजी प्रशासकांना रितसर योग्य न्याय द्यावा तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व वॉर्ड आरक्षण प्रक्रिया सुद्धा यापुर्वीच पुर्ण झालेली आहे. त्यामुळे गावगाडा व ग्रामपंचायतींचे कामकाज सुलभ व सुटसुटीत व्हावे, यासाठी मुदत संपलेल्या राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशी विनंती जनार्दन आंबेकर यांनी मंत्री महोदयांना केलेली आहे. या मागणीला जिल्ह्याभरातून मोठा पाठिंबा लाभत आहे. एका माजी सरपंचाने सर्वांचाच विचार केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना निश्चित यश येईल ,असेही म्हटले जाते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.