वरवेली, (गणेश किर्वे) - महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या उपक्रमांतर्गत वरवेली ग्रामपंचायत येथे महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी विशेष अर्ज नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील १४६ हून अधिक महिला शेतकऱ्यांनी उपस्थित राहून प्रमाणपत्रासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळावी तसेच शासनाच्या विविध कृषी योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण व मार्गदर्शन यांचा लाभ सुलभपणे मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा कृषी विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
या शिबिरास मंडळ कृषी अधिकारी नाळे, कृषी पर्यवेक्षक/उप कृषी अधिकारी सोनवणे, वरवेली गावचे सरपंच नारायण आगरे, ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, अरुण रावणंग, सेजल शिंदे, श्रावणी शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड , सहाय्यक कृषि अधिकारी खेडेकर, पत्रकार गणेश किर्वे, सुप्रिया देसाई, आशा सेविका दिव्या किर्वे, सुरज पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्राची आवश्यकता, अर्ज प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ झाली.
“महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख, कृषी सेवांपर्यंत सुलभ पोहोच आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.“सशक्त महिला शेतकरी – समृद्ध महाराष्ट्र” या उद्देशाने वरवेली येथे घेण्यात आलेल्या या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.