loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर आगारातील अपघातविरहित एस.टी. सेवा चालक महेश शिर्के सेवानिवृत्त

वरवेली (गणेश किर्वे) - एसटी महामंडळात तब्बल २२ वर्षे प्रदीर्घ व अपघातविरहित सेवा बजावणारे गुहागर आगारातील चालक महेश शिर्के नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या सेवाकाळात सुरक्षित आणि जबाबदारीने एसटी बस चालवत त्यांनी प्रवाशांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे. महेश शिर्के यांची सेवा निवृत्ती ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोरोना महामारीच्या काळातही महेश शिर्के यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेची धुरा सांभाळली. विद्यार्थ्यांना विविध सहलींच्या माध्यमातून पर्यटनस्थळे दाखवून त्यांना त्या ठिकाणची माहिती देण्याचे कामही त्यांनी केले. कलावती आई, बेळगाव यांच्या माध्यमातून एसटी बस घेऊन त्यांनी महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये प्रवास केला. या प्रवासातून विविध भागांतील संस्कृती, इतिहास व पर्यटनस्थळांची माहिती विद्यार्थ्यांना व प्रवाशांना देण्याचा प्रयत्न केला.

टाईम्स स्पेशल

त्यांचे शिक्षण पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये झाले. त्यावेळीही कोणताही कार्यक्रम असो या उपक्रम असो, यामध्ये ते हिरारीने भाग घेत होते. शालेय जीवनात त्यांनी अनेक वेशभूषा केल्या. त्याचप्रमाणे नोकरीच्या कालावधीतही एसटीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून अनेकांची मने जिंकली. एसटी सेवा ही केवळ नोकरी न मानता सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाऱ्या महेश शिर्के यांच्या २२ वर्षांच्या अपघातविरहित सेवेला सहकारी, प्रवासी आणि नागरिकांनी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg