loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीमान चंदूलाल हायस्कूलच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा जिल्हयात प्रथम क्रमांक, विभागीय स्पर्धेसाठी निवड

खेड (प्रतिनिधी) : दिनांक ७ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटात श्रीमान चंदूलाल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड च्या क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावून संपूर्ण जिल्ह्यात प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे. या दैदिप्यमान यशामुळे या संघाची कोल्हापूर येथे होणार्‍या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल प्रशाला समितीचे चेअरमन राजेशभाई बुटाला यांनी विजयी संघाचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे संस्था व प्रशालेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील विभागीय सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक धोत्रे, उपमुख्याध्यापक मस्के, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg