loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर, अभिनेत्री मधू कांबीकर यांना चिपळूण पंचायत समितीतर्फे श्रद्धांजली

चिपळूण (संतोष पिलके) : भारतीय तसेच मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने व प्रभावी संवादफेकीने रसिकांच्या मनावर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते तसेच 'नाम फाउंडेशन'चे संस्थापक पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल चिपळूण पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच सभेत ज्येष्ठ मराठी अभिनेत्री व लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर, पंचायत समिती चिपळूणचे उपसभापती संदेश आयरे यांच्या मावशी पुष्पा दत्ताराम आयरे तसेच तालुक्यातील ज्ञात-अज्ञात दिवंगत व्यक्तींनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेच्या सुरुवातीला सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत मान्यवरांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली. यानंतर सभागृहात दुखवट्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शरद शिगवण हे या ठरावाचे सूचक होते, तर विनोद झगडे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg