loader
Breaking News
Breaking News
Foto

निवासी रहिवाशांचा एमआयडीसी कार्यालयावर पाण्यासाठी आक्रोश मोर्चा

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील रहिवाशांनी बुधवार २१ तारखेला एमआयडीसी डोंबिवली कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पाणी खात्याचे उपअभियंता औदुंबर आलाट यांची भेट घेऊन पाणी समस्याबाबत चर्चा केली. चर्चेत रहिवाशांनी सलग ३६ तास पाणी पुरवठा बंदला कडाडून विरोध केला. ज्येष्ठ नागरिक संस्थेचे बबन काळे यानी येणाऱ्या शुक्रवार शनिवारचा ३६ तास पाणी पुरवठा बंद शट डाउन हा रद्द करावा, अन्यथा आम्ही मोठ्या संख्येने पुन्हा एमआयडीसी कार्यालयावर येऊन धडक मोर्चा काढू, असा इशारा दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अनेक महिलांनी यावेळी संतापून पाणी पुरवठा याच्या नियोजनाबद्दल एमआयडीसी दोष दिला. अश्विनी भंडारी या महिलेने अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारला. जर पाणी पुरवठ्यात योग्य सुधारणा झाली नाही तर पुन्हा आम्ही एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढू असे, मोर्चेकऱ्यांनी ठरविले आहे. या आक्रोश मोर्चाला रहिवाशांबरोबर सर्व पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगरसेवक भालचंद म्हात्रे, बबन काळे, संजय चव्हाण, राजू नलावडे, अजय घोरपडे, अश्विनी भंडारी, आनंद पाटणे, दीपक भानुशाली, किशोर पेटकर, विलास बोरोले व अनेक रहिवाशांनी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg