loader
Breaking News
Breaking News
Foto

आसूद ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; १० टक्के लाभांश जाहीर

दापोली (प्रतिनिधी) : आसुद ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आसुद ग्रामपंचायतीच्या सभागृहात संस्थाध्यक्ष मंगेश बांद्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला मोठ्या संख्येने भागधारक सभासद उपस्थित होतेच शिवाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुधीर कालेकर, सहाय्यक निबंधक अनिता बटवाल, वेदा मयेकर, रत्नागिरी जिल्हा बँकेचे सहाय्यक सर व्यवस्थापक नितेश मोहीते, संस्था उपाध्यक्ष वैभव वराडकर, सचिव चंद्रशेखर देपोलकर, संचालक सर्व वैभव धामणे, वैभव जोशी, दत्ताराम पवार, सुभाष बेनेरे, विलास बांद्रे, शब्बीर ऐनरकर, विकास मोहीते, रसिका इंदुलकर, वनिता येद्रे, राजेंद्र कातळकर, किर्तिकुमार वेलदुरकर, साखलोळी विकास सोसायटी चेअरमन वसंत शिंदे, विसापूर सोसायटी चेअरमन दत्ता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कोकणातील अग्रगण्य असणाऱ्या आसुद या सोसायटीने ३१ मार्च २०२६ अखेर ६३४३२२ रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. या संस्थेने आपल्या भागधारक सभासदांना १० टक्के लाभांशाची शिफारस केली होती, त्याला सभेने एकमताने मंजुरी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संस्थेचे ३२३८५४० रुपये भाग भांडवल आहे येणं कर्ज बाकी ३४०३३९६९ रुपये आहे. तर संस्थेच्या ठेवी २५२२७८९० रुपयांच्या आहेत. संस्थेने ७७३३७८३ रूपये बॅक गुंतवणूक केली आहे. संस्थेला " अ " दर्जा प्राप्त झाला असून आसुद परिसरातील सर्व सामान्यांची, शेतकऱ्यांची संस्था म्हणून या संस्थेचा अखंड महाराष्ट्र राज्यात नाव लौकिक आहे. या संस्थेने वेळोवेळी महाराष्ट्र शासनाचे सहकारातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार सातत्याने मिळवून केवळ संस्थेचाच नाही तर आपल्या तालूक्याचा जिल्हयाचा पर्यायाने कोकण विभागाचे नाव रोशन केले आहे. या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेले जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सुधीर कालेकर यांनी उपस्थितांना उत्तम असे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जगन्नाथ गोपाळ कडू, दत्ताराम काशिराम कदम, सुवर्णा सुरेश महाडिक, जितेंद्र शंकर शेवडे आणि सुधिर अनंत जगदाळे या उत्कृष्ट कर्जदारांचा तर राजेंद्र बाबाजी कडू, शैलेश वसंत खेडेकर, तुकाराम सखाराम धामणे, किसन रामा बेनेरे आणि हरिश्चंद्र शंकर माने या जेष्ठ सभादांचा जाहीर सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

आपल्या सभासदांच्या वारसांना दुःखद घटनेत रुपये एक हजार रुपये दुखवटा देणारी कोकणातील नव्हे तर राज्यातील एकमेव अशी ही संस्था असून दरवर्षी महालोन मेळावा तसेच मोफत दिनदर्शिका वाटप करणाऱ्या अशा या संस्थेने कायम सातत्याने आपल्या भागधारक सभासदांच्या हिताचाच विचार केल्यानेच या संस्थेचे एकुणच वाटचाली संदर्भातील स्थैर्य निश्चितच वाखान्यासारखे आहे. त्यामुळेच या संस्थेचा नावलौकिक सतत वाढत चालला आहे. सर्व साधारण वार्षिक सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्था सचिव चंद्रशेखर देपोलकर यांनी संस्थेचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला. संस्थेच्या आर्थिक उलाढालीचा उंचावत चाललेल्या आलेखाबाबत उपस्थित मान्यवर, संचालक, सहकार अधिकारी, बॅक अधिकारी तसेच सर्वच उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले. सभा यशस्वी होण्यासाठी चंद्रशेखर देपोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत नंदकुमार बांद्रे आणि सुमिता रविंद्र सकपाळ यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg