loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरची आमसभा आमदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न, कृषी अवजारांची प्रात्यक्षिके

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागरची आमसभा आज आमदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ही सभा सुरू होण्यापूर्वी नव्याने दाखल झालेल्या आणि अनुदानावर मिळणाऱ्या काही आधुनिक कृषी अवजारांची प्रात्यक्षिके अधिकाऱ्यांनी आमदारांना दाखवली. या प्रात्यक्षिकांमध्ये नारळ, सुपारी, आंबा, काजू यासारखी फळे काढण्यासाठीची यंत्रे, तसेच उंच झाडांवर फवारणी करणारे यंत्र आणि गवत कापणी यंत्र यांचा समावेश होता. ही यंत्रे कशी काम करतात, याचा उपयोग शेतकऱ्यांना कसा होणार याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिल. यावेळी आमदार भास्करराव जाधव यांनी स्वतः या यंत्रांची पाहणी करून ती कशी चालतात याची प्रात्यक्षिके करून पाहिली. आधुनिक कृषी अवजारांमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचणार असून शेती अधिक सुलभ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg