loader
Breaking News
Breaking News
Foto

मातीच्या कणाकणातून उभा राहिला स्वराज्याचा अभिमान; रामपेठच्या चिमुकल्यांनी साकारला ऐतिहासिक राजगड!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - दिवाळीच्या सुट्टीत मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून काहीतरी वेगळे करण्याचा आनंदच निराळा असतो. याच आनंदातून संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ येथील चिमुकल्यांनी आपल्या कल्पकतेला मेहनतीची जोड देत ऐतिहासिक राजगड किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. सुपाशु शेट्ये, साईश शेरे, अन्वेष शेरे, विहंग खातू, गुरुराज खातू, आर्यन खातू, रिजुल शेरे आणि अन्वय कोळवणकर या छोट्या किल्लेदारांनी एकत्र येत राजगडाची उभारणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लहान वयातच इतिहासाची आवड, गडकिल्ल्यांविषयीचे आकर्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयी असलेला अभिमान त्यांच्या या कलाकृतीतून दिसून येत आहे. माती, दगड आणि उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करत या बालकिल्लेदारांनी राजगडाचा ऐतिहासिक थाट उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. किल्ला उभारताना त्यांनी दाखवलेली एकजूट, कल्पकता आणि उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे, अशा उपक्रमांमधून मुलांना केवळ मनोरंजन मिळत नाही, तर इतिहासाची ओळख, सांघिक कामाची सवय आणि आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमानही निर्माण होतो.

टाईम्स स्पेशल

रामपेठच्या या चिमुकल्या किल्लेदारांनी आपल्या कलेतून शिवरायांच्या इतिहासाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. मोठ्यांच्या मार्गदर्शनाची वाट न पाहता चिमुकल्या हातांनी साकारलेला हा राजगड आज रामपेठमध्ये कौतुकाचा विषय ठरत असून, या बालकिल्लेदारांच्या कल्पकतेला सर्वत्र शाबासकी मिळत आहे!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg