loader
Breaking News
Breaking News
Foto

करक गावचे सरपंच सुरेश ऐनारकर यांची पुनर्वसन समितीवर नेमणूक

पाचल (सुरेश गुडेकर) - राजापूर तालुक्यातील करक गावचे सरपंच व आमदार किरण सामंत यांचे कट्टर समर्थक सुरेश गुणाजी ऐनारकर यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या पुनर्वसन समितीवर अशासकीय निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सुरळीत पार पाडावे व पुनर्वसनाची कार्यवाही करताना येणारे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींचा समावेश असणाऱ्या जिल्हा पुनर्वसन समितीची नव्याने स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अशासकीय निमंत्रित सदस्यपदी आमदार किरण तथा भैय्या सामंत यांच्या सूचनेनुसार करक गावचे सरपंच सुरेश ऐनारकर यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध अडीअडचणी मार्गी लागतील असा आशावाद सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजापूर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील बहुचर्चित अशा अर्जुना प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवताना सुरेश ऐनारकर यांनी आधी पुनर्वसन मग प्रकल्प ही भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला होता. आजही वेगवेगळ्या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर सुरेश ऐनारकर हे पोटतिडकीने बोलत असतात त्यांच्या या लढवय्या गुणामुळे आमदार किरण सामंत यांनी जिल्हा पुनर्वसन समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड होण्यासाठी शिफारस केली.

टाईम्स स्पेशल

सुरेश ऐनारकर हे आमदार सामंत यांचे कट्टर समर्थक असून शिवसेना युवा युवा शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. गेले अनेक वर्ष ते करक गावचे सरपंच पद भूषवत असून अर्जुना परिसरातील अर्जुना खोरे विकास मंडळ कारवली या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे संचालक म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पुनर्वसन समितीच्या अन्य अशासकीय निमंत्रित सदस्यपदी सुधाकर सुर्वे - खेड, निलेश कदम - चिपळूण व प्रवीण आर्डे - राजापूर यांचीही वर्णी लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg