loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर हायस्कूलचा विद्यार्थी गौरांग वाईरकर याची कबड्डी राज्यस्तर चाचणीत निवड

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील येथील वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज कट्टाचा इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी गौरांग गणेश वाईरकर याची कबड्डी स्पर्धेच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी 2026 साठी निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गौरांग गणेश वाईरकर याच्या या निवडीबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक , विजयश्री देसाई व सर्व संचालक, विश्वस्त, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट, मार्गदर्शक शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

गौरांग गणेश वाईरकर याची मेहनत व जिद्द तसेच त्याला प्रशालेतील शिक्षकांचे मिळणारे योग्य मार्गदर्शन त्यामुळे हे यश तो प्राप्त करू शकला. संस्थेला व प्रशालेला त्याचा अभिमान असून त्याच्या या राज्यस्तरीय निवडीमुळे प्रशालेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना संस्था पदाधिकारी व प्रशालेचे शिक्षक यांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg