loader
Breaking News
Breaking News
Foto

वरेरी येथे ३८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू; ग्रामीण रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

देवगड (प्रतिनिधी) - मूळ सोलापूर येथील व सध्या देवगड तालुक्यातील वरेरी-कुळयेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या रामदास पुराणिक लोहार (३८) यांचे शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास देवगड ग्रामीण रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास लोहार यांना दारूचे व्यसन होते. शनिवारी अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी त्यांचे बंधू अंबादास पुराणिक लोहार (४२) यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg