loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्रातील ANM, GNM व B.Sc. नर्सिंग शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

रत्नागिरी - महाराष्ट्रातील ANM, GNM आणि B.Sc. Nursing या नर्सिंग अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला भारतीय उपचर्या परिषद (Indian Nursing Council – INC), नवी दिल्ली यांच्याकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, B.Sc. Nursing अभ्यासक्रमासाठी १५ नोव्हेंबर २०२६, तर ANM व GNM अभ्यासक्रमांसाठी ३० नोव्हेंबर २०२६ ही सुधारित अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. भारतीय उपचर्या परिषदेच्या दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, महाराष्ट्र राज्यासाठी विशेष बाब म्हणून ही मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

B.Sc. Nursing अभ्यासक्रमासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश Regular/Even Batch मध्ये, तर १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश Irregular/Odd Batch मध्ये करण्यात येणार आहे. तसेच ANM व GNM अभ्यासक्रमासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश Regular/Even Batch मध्ये, तर १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश Irregular/Odd Batch मध्ये करण्यात येणार आहे. या दोन्ही बॅचच्या परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्या जाणार आहेत.

टाईम्स स्पेशल

परिषदेने ही मुदतवाढ केवळ महाराष्ट्र राज्यासाठी विशेष परिस्थितीत देण्यात आलेली एकदाच लागू होणारी सवलत असल्याचे स्पष्ट केले आहे. यापुढे प्रवेशाची मुदत वाढवून देण्याची विनंती स्वीकारली जाणार नसल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. असे आवाहन दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरीचे व्यवस्थापकीय विश्वस्त व मा. आमदार बाळ माने यांनी विद्यार्थ्यांना केले आहे की, ANM, GNM व B.Sc. Nursing या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून महाविद्यालयाशी तातडीने संपर्क साधावा आणि सुधारित अंतिम मुदतीपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. उपलब्ध मुदतवाढीचा लाभ घेऊन नर्सिंग क्षेत्रातील शैक्षणिक संधीचा उपयोग करून घ्यावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg