loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण भरड येथील दत्त मंदिरात २१ ऑक्टोबरपासून 'कीर्तन पंचक

मालवण (प्रतिनिधी) - मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 'कीर्तन पंचक २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत श्री दत्त मंदिर, भरड येथे रोज विविध धार्मिक व आध्यात्मिक विषयांवर नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. यामध्ये बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी विश्वास कुलकर्णी, पुणे यांचे महामुनी श्री अष्टावक्र' या विषयावर सायंकाळी ७ वाजता कीर्तन होणार आहे. गुरुवार, २२ रोजी हर्षद जोगळेकर, पुणे यांचे 'विठ्ठलभक्त जळोजी मळोजी' विषयावर रात्री ८.३० वाजता कीर्तन होईल. शुक्रवार, २३ रोजी ज्ञानेश धनोरकर जोशी, पुणे यांचे 'हनुमंत अनन्य भक्ती' या विषयावर सायंकाळी ७ वाजता कीर्तन होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवार, २४ रोजी वर्षा रानडे सहस्रबुद्धे, पनवेल यांचे 'संत मीराबाई' या विषयावर सायंकाळी ७ वाजता कीर्तन होईल. रविवार, २५ रोजी हरिहर नातू मालवण यांचे 'कौशिकी अवतार' (शुभ-निशुंभ वथ) या विषयावर सायंकाळी ७ वाजता कीर्तनाने या उपक्रमाची सांगता होणार आहे. कीर्तन कार्यक्रमांना ऑर्गनवर भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, पखवाज विशाल केळुसकर आणि तबला गजानन देसाई यांची साथ लाभणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भरड-मालवणतर्फे करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg