loader
Breaking News
Breaking News
Foto

समान पदाकरीता समान वेतन हा कर्मचाऱ्यांचा न्याय्य हक्क - ॲड. विलास पाटणे

रत्नागिरी - जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी यांना सुधारित वेतनवाढ मिळण्यासाठी कर्मचारी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. लिपिक, स्टेनोग्राफर, बेलीफ, शिपाई आदी जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी न्यायव्यवस्थेचा भाग आहेत. अपुऱ्या मनुष्यबळात न्यायालयीन कर्मचारी ताण सहन करीत आपल्या जबाबदारीने काम करीत आहेत. वेतन व सेवाविषयक मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या आंदोलनाला जिल्हा बार असोसिएशनचा पाठिंबा असून संघटनेला पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन रत्नागिरी बारचे अध्यक्ष ॲड विलास पाटणे यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रथम काळी फित लावून तर 5 नोव्हेंबर रोजी रजा आंदोलन शेवटी 17 नोव्हेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन राहील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन जाखी यांनी दिली. यावेळी बारचे उपाध्यक्ष ॲड. निनाद शिंदे, कोषाध्यक्ष ॲड अवधूत कळंबटे, सहसचिव राहुल चाचे, संघटनेचे सचिव राकेश शिंदे, प्रशांत सावंत आणि कौस्तुभ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष सचिन जाखी यांनी संघटनेला सहकार्य करण्याची विनंती बार असोसिएशनला केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg