loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरणचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पुढाकार; सावर्डे केदारनाथ कॉलनीत धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी

सावर्डे (विनायक सावंत) :पावसाळा असो वा उन्हाळा, नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि संभाव्य वीजव्यत्यय टाळता यावा, यासाठी महावितरण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून चिपळूण तालुक्यातील सावर्डे महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या केदारनाथ कॉलनी परिसरात विद्युत तारांवर झुकलेल्या तसेच विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात आली.केदारनाथ कॉलनी परिसरात मोठ्या वृक्षांच्या फांद्या विद्युत तारांच्या जवळ आल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही ठिकाणी या फांद्यांमुळे विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण होत होता. भविष्यात वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये, तसेच संभाव्य धोका टाळता यावा, या उद्देशाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष परिसरात उतरून फांद्या छाटण्याचे काम हाती घेतले.या कामासाठी महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. प्रशांत आंबेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. मोठ्या वृक्षांवरील धोकादायक फांद्या नियोजनपूर्वक काढून विद्युत वाहिन्यांच्या परिसरातील अडथळे दूर करण्यात आले. उंच झाडांवर चढून आणि आवश्यक ती खबरदारी घेत कर्मचाऱ्यांनी हे काम पूर्ण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोहिमेत तेजस कुंभार, नयन उडरे, प्रशांत हरेकर, श्रीधर कदम, सन्मय बागवे, रुपेश काजारे, सुनील सोलकर, प्रसाद गुरव, संस्कार हुमणे आणि मोठ्या झाडावर चढून फांद्या तोडण्यास कसबगीर मयुरेश राजेशिर्के यांनी अथक परिश्रम घेतले.वीजपुरवठा सुरळीत ठेवणे हे केवळ वीजपुरवठा सुरू ठेवण्यापुरते मर्यादित नसून त्यासाठी विद्युत वाहिन्यांची देखभाल, परिसरातील झाडांच्या फांद्यांची वेळोवेळी छाटणी आणि संभाव्य अडथळे वेळीच दूर करणेही तितकेच महत्त्वाचे असते. याची जाणीव ठेवून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केदारनाथ कॉलनी परिसरात केलेले हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे.नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि वीजपुरवठा अखंडित राहावा, यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचे केदारनाथ कॉलनी परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg