रत्नागिरी, : भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाला गती देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कोकण प्रदेश (मुंबई) भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक अनिल माने यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यानिमित्त जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात आयोजित विशेष शिबिरात (कॅम्प) जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना समोरासमोर बसवून मार्गदर्शन करण्यात आले आणि एकाच दिवशी तब्बल १३० प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात आली. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य, पुणे) यांच्या सूचनेनुसार या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या दौऱ्यादरम्यान उपसंचालक अनिल माने यांनी स्वामित्व योजना, नक्षा २.०, महानक्षा, ‘आधी मोजणी मग खरेदी’, भूसंपादन मोजणी, कमी-जास्त पत्रके, आकारफोड पत्रके तसेच आस्थापना व लेखाविषयक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. कामात कोणतीही हलगर्जी किंवा दिरंगाई न करता प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. तसेच जिल्ह्यातील मोजणी कामे अधिक वेगवान व अचूक व्हावीत यासाठी जमाबंदी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अत्याधुनिक ‘रोव्हर्स’चे (Rovers) वाटप करण्यात आले. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेअंतर्गत मंजूर पाणंद रस्त्यांची अचूक मोजणी करून जिओ-रेफरन्सिंगद्वारे नकाशामध्ये रस्ते समाविष्ट करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमानुसार अतितातडीची (द्रुतगती) मोजणी प्रकरणे १४ दिवसांत, तर नियमित मोजणी प्रकरणे २८ दिवसांत निकाली काढण्याची कार्यवाही सध्या जिल्ह्यातील लांजा आणि मंडणगड तालुक्यांत सुरू आहे. उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये ही गतिमान सुविधा डिसेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांना घरबसल्या सर्व नकला ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देतानाच शासनाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावरील ‘महाभूमी स्टॅक’द्वारे एका क्लिकवर मालमत्तेची संपूर्ण माहिती व कागदपत्रे उपलब्ध असून, शेतकरी व खातेदारांनी या पारदर्शक व गतिमान सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक अनिल माने यांनी केले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.