loader
Breaking News
Breaking News
Foto

हायटेक इंटरनॅशनल कंपनीसमोर कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण ' किरकोळ अपघाताच्या रागातून चौघांचा हल्ला

रसायनी(आनंद पवार)मोटारसायकलला धक्का लागून झालेल्या किरकोळ अपघाताचा राग मनात धरून हायटेक इंटरनॅशनल कंपनीतील कामगार संतोष मंडल याला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.याशिवाय,संबंधितांनी विनापरवानगी कंपनीच्या आवारात प्रवेश करून तेथील अन्य व्यक्तींनाही मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कुणाल काशिनाथ निकम,करण काशिनाथ निकम व अन्य दोन साथीदारांविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेप्रकरणी हायटेक इंटरनॅशनल कंपनीचे कामगार ईशान नरेश सिक्का यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यातील जांभिवली वाडी येथील कुणाल काशिनाथ निकम,करण काशिनाथ निकम व अन्य दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१),११५(२), ३२९(१),३५२, ३५१(२),३(५) तसेच तक्रारीत नमूद भारतीय दंड विधानातील कलम ४४१,३२४,३२३, ५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोहित शिंदे करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg