loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली विधानसभा मतदार संघात खासदार सुनील तटकरेंची संघटनात्मक पकड मजबूत

दापोली (प्रतिनिधी) : रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात आपली राजकीय आणि संघटनात्मक पकड ईतकी मजबूत केली आहे की, कुणीही कितीही प्रकारे ती आटोकाट भेदण्याचा प्रयत्न केला तरी त्यात त्यांनाच काय तर कोणालाच यश मिळणार नाही. ईतके खासदार सुनील तटकरेंचे संघटन खोलवर मजबूतच रुजलेले आहे. दापोली विधानसभा मतदार संघ हा दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांचा समावेश असलेला एक विधानसभा मतदार संघ आहे. अशा राजकीय दृष्टया महत्त्व असलेल्या विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जातो. बाणकोट बागमांडला पुल असेल केळशी साखरी पुलाचे काम असेल नाहीतर हर्णे येथील मच्छीमारी जेटीचे काम असेल अशी कितीतरी कोट्यावधी रुपयांची विकास कामे खासदार सुनील तटकरेंच्या पुढाकाराने मार्गी लागली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावा गावातील जल जीवन मिशनची कामे ही केंद्राच्या निधींचीच आहेत तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून रस्त्याची सुरू असलेल्या कामांचे श्रेय खासदार सुनील तटकरेंशिवाय अन्य कोणालाही घेता येणार नाही. विकास कामांसोबतच आपल्या ओघवत्या भाषेतील शैलित संवाद साधण्याचे असलेले कौशल्य क्वचितच एखाद्याकडे असते तसे ते खासदार सुनील तटकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे गावागावातील कार्यकर्तेच काय तर सर्वसामान्यसुध्दा खासदार तटकरेंशी जोडला गेला आहे. दापोलीत पूर्वी राष्ट्रवादीचा आमदार होता. पक्षाचे ’गतवैभव’ पुन्हा मिळवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश खासदार सुनील तटकरेंनी दिले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवं चैतन्य निर्माण झाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg