loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजभूषण, शिक्षण महर्षी लोकनेते नंदकुमार मोहिते यांच्या जयंती निमित्त स्मृतिगौरव सोहळा व कार्यस्मरण विशेषांक प्रकाशित करण्याचा निर्धार

रत्नागिरी : शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात समाज कल्याणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे समाजभूषण, शिक्षण महर्षी लोकनेते नंदकुमारजी मोहिते यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याप्रती स्मरण जतन करण्यासाठी मंगळवार, दिनांक २९ डिसेंबर २०२६ रोजी शिवार आंबेरे, जि. रत्नागिरी येथील त्यांच्या जन्मगावी 'स्मृतिगौरव सोहळा व कार्यस्मरण विशेषांक प्रकाशन सोहळा' आयोजित करण्यात येणार आहे. श्रमिक किसान सेवा समिती रत्नागिरी या समितीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी सुरुवात करुन शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करण्यास सुरुवात केली. सन १९९१ मध्ये त्यांनी इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग श्रमिक विद्यालयाला जोडून सेमीचे वर्ग सुरु केले. सेमी इंग्रजी माध्यम तसेच लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय यांचीही स्थापना सन २००८ मध्ये केली. तसेच क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूलची स्थापना सन २०१३ मध्ये केली. दहावी-बारावी परीक्षा केंद्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वाचनालय सुरु केले. कै. आनंदीबाई मोहिते विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह उभारुन मुले-मुलींची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था सन २०१५ मध्ये केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओबीसी संघर्ष समिती रत्नागिरीचे त्यांनी माजी अध्यक्ष म्हणून पद भूषविले असून महाराष्ट्र ओबीसी राजकीय संघटन समितीचे ते माजी सदस्य होते. सहकार क्षेत्रात कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरीचे ते संस्थापक होते. त्यांनी सन २०१३ ते २०१८ रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य भूषवित होते. राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्यही उल्लेखनीय होते. बहुजन विकास आघाडी, रत्नागिरी या राजकीय संघटनेचे ते माजी सरचिटणीस म्हणून काम पाहात होते. तसेच बळीराज सेना या राजकीय पक्षाचे सुध्दा ते माजी सरचिटणीस होते. गावचा विकास व्हावा म्हणून त्यांनी त्यांच्या शिवार आंबेरे या गावी सन १९८१ ते १९९५ असे सलग १५ वर्षे सरपंच पद भूषविले असून गावात ग्रामपंचायत वास्तू नव्हती म्हणून त्यांनी स्वतःच्या निवासस्थानी ग्रामपंचायत कार्यालयाची सुरुवात केली. सहकार, राजकीय आणि शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात आंबा बागायदारांचे प्रश्न, शेतकरी व मच्छिमार बांधवांचे प्रश्न, ओबीसींचे प्रश्न मोर्चे व आंदोलने जनजागृतीतून मार्गी लावून त्यांचे अधिकार व हक्क बहाल केले. शैक्षणिक आरक्षण, शिष्यवृत्ती, कुळ कायदा प्रश्नांवरही प्रकाश टाकला. समाजरत्न आणि विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित साहेबांचे कार्य उत्तुंग आहे. सरपंच, सोसायटीचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य या पदांवरील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

टाईम्स स्पेशल

तन-धन-मन अर्पण करुन त्यांनी आपले संपूर्ण जीवन या समाज कल्याणासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. आपले सर्वांचे प्रेरणास्थान समाजभूषण, शिक्षण महर्षी, लोकनेते नंदकुमार मोहिते साहेब यांचे कार्य असीम आहे. साहेबांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेत जिल्हयातील तमाम सुज्ञ नागरिकांनी, मित्रमंडळी, हितचिंतक, सहकारी, जाहिरातदार यांनी दि. २९ डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या 'स्मृतिगौरव सोहळा व कार्यस्मरण विशेषांक प्रकाशन सोहळा' या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि या निमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरण गौरव विशेषांकामध्ये साहेबांच्या स्मृतिंना उजाळा देणारे लेख, आठवणी आणि संदेश तसेच आपल्या व्यावसायिक संस्थांची जाहिरात देवून या सोहळयास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. कार्यस्मरण विशेषांक प्रकाशन समितीचे अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि बळीराज सेना उपाध्यक्ष सुरेश भायजे यांनी सर्वांना या कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg