loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणकेश्वर हायस्कूलच्या निकिता भोगलेला तायक्वांदोमध्ये कांस्यपदक, कोल्हापूर विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी; प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा

देवगड (प्रतिनिधी) - वारणानगर येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर, कुणकेश्वरच्या निकिता रोहिदास भोगले हिने कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे प्रशालेच्या क्रीडा यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या सहकार्याने या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या ३२ ते ३५ किलो वजनगटात निकिता भोगले हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निकिताला प्रशालेचे क्रीडाशिक्षक बाळासाहेब ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष चंद्रकांत घाडी, उपाध्यक्ष तुकाराम तेली, सचिव संकेत लब्दे, खजिनदार रावजी वाळके, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय राणे, कुणकेश्वर केंद्रप्रमुख देवकी शिंदे, कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले. आगामी स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg