loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय डाक विभाग सिंधुदुर्ग सहाय्यक अधीक्षक विश्वनाथ गिरकर यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी) - देवगड तालुक्यातील मूळ गाव कुणकेश्वर वाळकेवाडी येथील विश्वनाथ गिरकर सध्या वरेरी येथे वास्तव्यास आलेल्या भारतीय डाक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत असलेले तसेच दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले विश्वनाथ गिरकर (वय ५६) यांचे बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर येथील अंतरंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सकाळी १०.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकालीन यकृत निकामी होण्याच्या (क्रॉनिक लिव्हर फेल्युअर) आजाराने ते ग्रस्त होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय पोस्ट ऑफिस विभागात सहाय्यक अधीक्षक पोस्ट ऑफिसर या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे निधन झाले असून भारतीय डाक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाय्यक अधीक्षक पदावर ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्याकडून अनेक सामाजिक कामांसाठी हातभार लागला होता. त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रमांसाठी सढळ हस्ते मदत केली होती. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून तेंचि सिंधुदुर्गमध्ये ओळख होती. मनमिळाऊ स्वभाव व एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजात ओळख होती. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

भारतीय डाक विभागात त्यांनी सहाय्यक अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. शासकीय सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली होती. विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांना त्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली होती. दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची ओळख होती. मनमिळाऊ स्वभाव, दिलखुलास व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्याची आवड यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच देवगडसह परिसरात शोककळा पसरली असून, सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg