loader
Breaking News
Breaking News
Foto

फ्लॅटचा ताबा न दिल्याने बिल्डरला ग्राहक आयोगाचा दणका; १०.५० लाख ९% व्याजासह परत करण्याचे आदेश

खेड (प्रतिनिधी) : नियोजित इमारतीतील फ्लॅटची संपूर्ण रक्कम स्वीकारूनही ठरलेल्या मुदतीत ताबा न दिल्याने ठाणे येथील बिल्डरला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे. या प्रकरणात तक्रारदारांतर्फे एडवोकेट सुधीर शरद बुटाला व एडवोकेट समीर शरद शेठ यांनी काम पाहिले. ग्राहकाकडून घेतलेली १० लाख ५० हजार रुपयांची रक्कम वार्षिक ९% व्याजासह परत करावी, तसेच मानसिक त्रासापोटी ५० हजार आणि खर्चापोटी १० हजार रुपये द्यावेत, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड तालुक्यातील शिंदेवाडी येथील निवृत्त शिक्षिका अंजली अनंत शिंदे यांनी ठाणे येथील ‘आर. डी. लाईफस्टाईल होम्स’चे प्रोप्रायटर वृषभ दिनकर हरळकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. चिपळूण पाग भागातील ‘पाममिडोज’ इमारतीमधील फ्लॅट क्र. १०५ (किंमत १२.८० लाख) साठी २०१६-१७ मध्ये १०.५० लाख अदा करण्यात आले होते. मात्र, दोन स्लॅबनंतर बांधकाम बंद पडले.

टाईम्स स्पेशल

आयोगाने नोटीस, वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन देऊनही बिल्डर गैरहजर राहिल्याने २ जून २०२६ रोजी एकतर्फी आदेश दिला. अध्यक्षा वंदना स्व. मिश्रा, सदस्य स्वप्निल मेढे व सदस्या अमृता भोसले यांच्या पीठाने हा आदेश दिला. या प्रकरणात तक्रारदारांतर्फे एडवोकेट सुधीर शरद बुटाला व एडवोकेट समीर शरद शेठ यानी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आदेश दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg