loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुक्यात ३० ऑक्टोबर रोजी 'किसान गोष्टी' व पशुपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

​वैभववाडी (प्रतिनिधी) - शेतकरी आणि पशुपालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कृषि विभाग वैभववाडी, पंचायत समिती वैभववाडी आणि सामाजिक वनीकरण वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी तालुक्यात 'किसान गोष्टी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ​हा विशेष मेळावा ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता 'सुवर्णसिंधु गिर गोशाळा, मौजे मांगवली (संसारे वाडी)' येथे पार पडणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या मेळाव्यात खालील महत्त्वपूर्ण विषयांवर कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ​दुग्धव्यवसायात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या चारा पिकांच्या लागवडीबाबत शास्त्रीय माहिती. पशुपालक व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय अनुदान योजनांची सविस्तर माहिती. जनावरांचे शास्त्रीय व आधुनिक पद्धतीने संगोपन व व्यवस्थापन कसे करावे, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

टाईम्स स्पेशल

​या शेतकरी मेळाव्याला पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावरणे, जिल्हा परिषद सदस्य. प्रमोद रावरणे, श्रावणी रावरणे, रिद्धी सुतार यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य, आत्मा समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, इतर लोकप्रतिनिधी आणि विविध दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील पशुपालक शेतकरी व नागरिकांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा आणि विविध योजनांच्या माहितीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा समिती व तालुका कृषि अधिकारी निरंजन देशमुख यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg