loader
Breaking News
Breaking News
Foto

सुरळ येथील श्री वाघजाई काळकाई देवीचा नवरात्रोत्सव, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील सुरळ येथील श्री वाघजाई काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने श्री वाघजाई काळकाई देवीचा नवरात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ते १९ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी गावदेवीची मूर्ती पूजा व आरती, सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती, रात्री ९.०० ते ११.३० वा. ग्रामस्थांसाठी दांडिया नृत्य, आयोजित करण्यात आले आहे. तरी दि.१७ रोजी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धा, रविवार दि.१८ ऑक्टोबर रोजी दांडिया नृत्यानंतर पुरुष व महिलांसाठी विविध स्पर्धा, सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी विशेष रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, विविध स्पर्धाचा बक्षीस वितरण सोहळा, महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुरळ येथील श्री वाघजाई काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg