loader
Breaking News
Breaking News
Foto

चिंचघर-प्रभूवाडी येथील भैरवनाथ देवस्थानात नवरात्र उत्सवानिमित्त योगासन महाशिबिर संपन्न

खेड (प्रतिनिधी) : चिंचघर-प्रभूवाडी येथील राज्य प्रादेशिक पर्यटन स्थळ असलेल्या श्री भैरवनाथ देवस्थान येथे नवरात्र उत्सव २०२६ निमित्त शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजयराव वसंतराव कदम यांच्या संकल्पनेतून व भैरवनाथ मंदिर कमिटीच्या सहकार्यातून आयुष होमिओपॅथिक योगा यांच्या अधिपत्याखाली जनतेसाठी योगासन महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले योगासन आणि त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग याबाबत डॉ. सौ. वैष्णवी विक्रांत पाटील व डॉ. विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष योगासन करून दाखवत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी देवस्थान कमिटीच्या वतीने दोन्ही डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष प्रद्योत उर्फ भाई कडू, उपाध्यक्ष शिवाजी शेलार, खजिनदार अशोक कडू, सचिव रूपेश महाडिक, सहसचिव दत्ता पवार, ग्रामसेवक किशोर शिरसागर, तसेच दस्तुरी शाळा व प्रभूवाडी शाळेतील गुरुजी व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg