loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐतिहासिक वारसा जपणाऱ्यांना युवासेनेचे बळ, गड-किल्ल्यांच्या प्रतिकृति बनविणाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी - छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास जतन करण्यासाठी आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या युवासेनेने एक स्तुत्य व प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, सचिव विकास गोगावले, कार्यकारिणी सदस्य अपुर्वा सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या पुढाकाराने रत्नागिरी तालुक्यात अनोखा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ज्या किल्लेप्रेमींनी दिवाळीत गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत, तिथे प्रत्यक्ष भेट देऊन त्या शिवप्रेमींचा गौरव करण्यास आरंभ केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोहिमेंतर्गत आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील १० ठिकाणी छोट्या-मोठ्या किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. दिवाळीमध्ये अनेक ग्रुप किंवा शिवप्रेमी वेगवेगळ्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृति बनविण्याचा आनंद घेतात. काही शिवप्रेमी तर प्रत्यक्ष किल्ला पाहून आल्यानंतर त्याची हूबेहूब प्रतिकृती साकारतात. यामधून त्यांच्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रति असलेले प्रेम अधोरेखित होते. त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने युवासेनेने रत्नागिरी तालुक्यात दोन वर्षे सतत किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली. यंदा स्पर्धेपुरते अडकून न पडता, गड-किल्ल्यांसाठी मेहनत करणाऱ्यांचा युवासेनेकडून जागेवर जाऊन सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यासाठी गेले काही दिवस युवासेनेचे जिल्हाप्रमुख तुषार साळवी आणि तालुकाप्रमुख हर्षराज पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी दुर्गप्रेमींच्या भेटीला जात आहेत.

टाईम्स स्पेशल

आतापर्यंत खेडशी येथील 'शिवशक्ती ग्रुप', कोळंब्यातील 'बागावडितला बागानेश्वर ग्रुप' तसेच नाचणे परिसरातील वैयक्तिक किल्ले जतन करणारे दुर्गप्रेमीशी त्यांनी संवाद साधला आहे. तसेच त्यांचा सत्कारही केला आहे. यामध्ये पन्हाळा, विशाळगड आणि पावनखिंड यांच्या हुबेहूब आणि आकर्षक प्रतिकृतींचे दर्शन झाले. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी युवासेनेचे अभिजीत घोडके, प्रशांत चाळके, प्रथमेश पाटील, रितेश साळवी, चैतन्य झाडगावकर नंदकुमार कुवर, गणेश शिंदे, वैभव कांबळे, अमेय शिवलकर, संजय नाईक हे मेहनत घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg